40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता १० हजाराची लाच स्विकारतांना महसूल सहायक शालू कावळे एसीबीच्या जाळ्यात

१० हजाराची लाच स्विकारतांना महसूल सहायक शालू कावळे एसीबीच्या जाळ्यात

0
370

गोंदिया,दि.१७ः- येथील तहसिल कार्यालयातील कार्यरत महसूल सहायक श्रीमती शालू कमलेश कावळे(वय 38) (वर्ग 03)यांना १० हजार रुपयाची लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सविस्तर असे की यातील तक्रारदार हे भारतीय नौसेनेचे माजी सैनिक व पोलीस खात्यातून सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक असून ते माजी सैनिक असल्याने शासनाकडून ग्राम तेढवा, तालुका गोंदिया येथील सिलिंगची जमीन भूमापन क्रमांक 174 मिळावी म्हणून तहिलदार गोंदिया यांना Maharashtra Agriculture Land (celling on Holding’s)Act 1961 अंतर्गत जमीन नावावर करून देण्यात यावी याबाबत अर्ज केला होता.यातील आरोपी लोकसेवक यांनी सदरील अर्जावर कार्यवाही करण्याकरिता तक्रारदाराकडे 50,000 हजार लाचेची मागणी केली,मात्र तक्रारदारास रक्कम मुळीच द्यायची नसल्याने एसीबी कार्यालय, गोंदिया येथे दिनांक 16/06/2026 रोजी तक्रार नोंंदवली.त्या तक्रारीनुसार तक्रारीच्या अनुषंगाने दि. 16/06/2026 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई मध्ये आ.लो.से यांनी तक्रारदार यांचे अर्जप्रमाणे काम करून देण्याकरिता मोबदला म्हणून 50 हजार लाचेची मागणी करून त्याचा अँडव्हान्स म्हणून 10,000 रुपये लाचेची मागणी केली व उर्वरित 40 हजार रुपये काम झाल्यानंतर देण्याचे ठरवून लाच स्विकारण्याची तयारी दर्शवल्याने आज दिनांक 17/06/2026 रोजी सापळा रचले असते आलोसे शालू कमलेश कावळे, महसूल सहायक, तहसील कार्यालय, गोंदिया यांना तक्रारदार यांचेकडून 10,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.आरोपीची घरझडती आरोपीची घर झडती घेण्याची प्रक्रिया व पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वात सापळा कारवाई करण्यात आली.या मोहीमेत अरविंद राऊत पोलीस निरीक्षक,ASI चंद्रकांत करपे, HC संजयकुमार बोहरे, HC मंगेश काहालकर, PN संतोष शेंडे, PN संतोष बोपचे, PN अशोक कापसे, PN प्रशांत सोनवणे, PN कैलास काटकर, PN दीपक बाटबर्वे, LNPC रोहिणी डांगे यांनी सहभाग घेतला.