32.5 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home गुन्हेवार्ता रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या; फुलचुरच्या किसान चौकातील घटना

रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या; फुलचुरच्या किसान चौकातील घटना

0
134

गोंदिया,दि.२३ः. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलचुर येथील कारंजा रोडवरील किसान चौक परिसरात एका ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या डोक्यावर दगड किंवा धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ही घटना मंगळवार, २३ जूनच्या सकाळी उघडकीस आली.ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृताची ओळख अनमोल ऊर्फ शंभू वसंत रंगारी (वय ३५, रा. भद्रुटोला, कारंजा) अशी पटली असून, तो रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होता.
एका अज्ञात हल्लेखोराने अनमोलच्या डोक्यावर दगड किंवा धारदार शस्त्राने प्रहार करून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि तपासासाठी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाला पाचारण करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली असून, ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.