26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ जिल्हास्तरावर जातपडताळणी कार्यालय सुरू होणार

जिल्हास्तरावर जातपडताळणी कार्यालय सुरू होणार

0
34
blank
blank

भंडारा,दि. १5 : : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी व बेरोजगार युवकांना आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी विभागीय कार्यालय, नागपूर यांचेवर अवलंबून राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा परिषद सदस्य असतापासुन भंडार्‍यात जिल्हास्तरावर जात वैधता पडताळणी कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.
आता तुमसर मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्यानंतर विधानसभेत विविध आयुधांव्दारे प्रश्न उपस्थित करून जिल्हास्तरावरील कार्यालयाचे महत्व पटवून दिले. यामुळे शासनाने शासन परिपत्रक काढून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कार्यालय कार्यान्वित करण्याचे आदेश दिले असुन भंडारा येथील कार्यालय अध्यक्ष म्हणून एम. एम. सुर्यवंशी (अतिरिक्त कार्यभार), सुरेंद्र पवार उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा, (अतिरीक्त कार्यभार), समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे, (सदस्य सचिव) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्राची पायपीट आता थांबणार असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी कळविले आहे.

blank