34.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ संघ व भाजपच्या प्रतीकांचा अवमान केल्याचा आरोप

संघ व भाजपच्या प्रतीकांचा अवमान केल्याचा आरोप

0
21

गोरेगाव दि. २६ : अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणास विरोध दर्शविणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या प्रतीकांचा कथित अवमान करण्यात आल्याचा आरोप करीत भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे निषेध नोंदविला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या नावे तहसीलदारांना गुरुवारी (दि. २५) निवेदन देण्यात आले. निवेदनातून अनुसूचित जातीमधील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांना न्याय मिळावा तसेच आरक्षण व शासकीय योजनांचा लाभतळागाळातील गरजू घटकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने शासन अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या विषयावर विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत एका आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचे तसेच भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाचे अपमानकारक प्रदर्शन करण्यात आल्याचे छायाचित्रे व वृत्त माध्यमांतून समोर आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, समाजात वैमनस्य व सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर भारतीय न्याय संहिता तसेच इतर कायद्यांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.शिष्टमंडळात भाजपचे माजी तालुका अध्यक्ष साहेबलाल कटरे, जीडीसीसी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जे.डी. जगनित, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मोरेश्वर कटरे, माजी जि.प. सदस्य खुवेंद्र मेंढे, राष्ट्रीय स्वयं संघ तालुका कार्यवाह श्रीकांत चौधरी, माजी सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, माजी सभापती विजय राणे, गोंदिया-भंडारा बजरंग दल विभाग संयोजक सुभाष पटले, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री सुनील कोहळे, डॉ. योगेश हरिणखेडे, सुरेंद्र पटले, हिरालाल रंहागडाले, बाबुलाल गौतम, मेघनाथ पारधी, नितीन कटरे, पंचायत समिती सदस्य किशोर पारधी, अंकित रंहागडाले, विशाल पारधी, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्यारेलाल गौतम, मोरेश्वर रहागडाले, गुड्डू कटरे, रवी कटरे यांचा समावेश होता.