36.8 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ पिंडकेपार येथे पल्स पोलिओ मोहीम चिमुकल्यांना पाजले पोलिओचे डोस

पिंडकेपार येथे पल्स पोलिओ मोहीम चिमुकल्यांना पाजले पोलिओचे डोस

0
6

गोरेगाव-राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत आज रविवार २८ जून रोजी पिंडकेपार व कनारटोला येथे गावातील ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देऊन त्यांना सुरक्षित करण्यात आले.या प्रसंगी ग्राम पंचायत पिंडकेपार चे उपरासपंच भरत घासले, ग्राम पंचायत सदस्य निलकंठ बिसेन, प्राथमिक उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी माहुरे, अंगणवाडी सेविका नानेश्वरी टेभरे, आशा सेविका ज्ञानेश्वरी बिसेन व लाभार्थी उपास्थित होते.सकाळी ८:वाजेपासूनच पालकांनी आपल्या चिमुकल्यांना घेऊन लसीकरण केंद्रावर पोहचण्यास सुरुवात केली.आरोग्य विभागाच्या वतीने गावातील एकही बालक लस घेण्यापासून वंचित राहू नये, यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. मुख्य केंद्राव्यतिरिक्त, जे पालक केंद्रावर येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य दूत यांच्यामार्फत ‘घर-घर भेट’ (डोअर-टू-डोअर) मोहीम राबवून बालकांना डोस पाजण्यात आले.