गोरेगाव- तालुक्यातील मुंडीपार ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपसरपंच जावेद खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले.
शासनाच्या दिव्यांग कल्याण धोरणानुसार दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचेही नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य भाऊलाल कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी दिव्यांग नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा हक्काचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात डेकचंद रहांगडाले उपस्थित होते.





