24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home गुन्हेवार्ता पुलावरून चारचाकी कोसळली 7 गंभीर जखमी

पुलावरून चारचाकी कोसळली 7 गंभीर जखमी

0
537

गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा ते नवेगावबांध मार्गावर रविवार २८ जूनच्या रात्रीला ८ वाजेच्या सुमारास पुलावरून चारचाकी वाहन चुलबंद नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली.तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकडीतील स्थानिक राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा गट नवेगाव धरणावर गेला होता आणि परतत असताना हा अपघात झाला, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सुदैवाने, सर्वजण सुरक्षित आहेत; त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार देण्यात आले आणि त्याच रात्री घरी सोडण्यात आले.
सविस्तर माहितीनुसार, नवेगाव धरणावरून कोहमाराच्या दिशेने ‘अर्टिगा’ कारमधून (क्रमांक MH 14 FG 2068) प्रवास करणाऱ्यांमध्ये सुनील नामदेव मेश्राम (४४), संदीप भाऊराव कुर्वे (३८), रूपाली सतीश राणे (३०), प्रतिमा, प्रल्हाद शेंडे (३७), कल्पना निलेश उके (२८), सतीश राणे, यश, निलेश उके (११), कैलास शेंडे (१०) आणि चालक सुनील पाठक (३१) यांचा समावेश होता. लकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले; कार पुलाचे रेलिंग तोडून चुलबंद नदीत कोसळली आणि चारही चाकांवर उभी राहिली. यातील काही प्रवासी सुकली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असल्याचे समजते. पोलीस निरीक्षक गणेश वानरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुणवंत कटाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.