33.8 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home राजकीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहात खासदार राजेंद्र जैन यांचा शपथविधी

संसदेच्या वरिष्ठ सभागृहात खासदार राजेंद्र जैन यांचा शपथविधी

0
27

गोंदिया,दि.२९ः- आज दिल्ली येथे संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य (खासदार) राजेंद्र जैन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेत संसदीय कारकिर्दीची अधिकृत सुरुवात केली.राज्यसभेचे सभापती तथा भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते खासदार राजेंद्र जैन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या ऐतिहासिक क्षणानंतर राजेंद्र जैन यांनी देशहित, संविधानातील मूल्ये आणि जनतेच्या अपेक्षांप्रती निष्ठा राखून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.blank

दरम्यान या निवडीबद्दल देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, नामदार छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार,दिलीप वळसे पाटील व राज्यातील सर्व आमदार महोदय यांचे आभार मानले. तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित प्रश्न राज्यसभेत प्रभावीपणे मांडून जनतेच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.