29.6 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ खजरी येथील मातोश्री पांदण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे,कारवाईची मागणी

खजरी येथील मातोश्री पांदण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे,कारवाईची मागणी

0
10

सडक अर्जुनी,:-तालुक्यातील खजरी येथे मातोश्री पांदण रस्ता योजनेतंर्गत बांधकाम विभागाच्या माध्यमातून राकेश राऊत ते योगराज लटये यांच्या शेतापर्यत अंदाजे 20 लक्ष रुपये निधीतून काम हाती घेण्यात आले असून सदर मातोश्री पांदण रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप माजी उपसरंपच उमराव मांढरे यांनी केला आहे.तसेच सदर रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावे अशी मागणी केली आहे.पांदन रस्ताच्या कामात 80 टी दगड टाकल्यानंतर त्यावर मुरूम टाकून त्यावर रोडरोलर दबाई न करता त्यावर सरळ 40 टी दगड कमी प्रमाणात घालून रस्ता पुर्ण करण्याचे काम कंत्राटदार करीत असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी सदर काम बंद पाडले आहे.ग्रामपंचायत पदाधिकारी व कंत्राटारास शेतकऱ्यानी व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी कामाचे अंदाजपत्रक मागितले असता आमदार साहेबांनी अंदाजपत्रक द्यायला सांगितले नाही असे उत्तर देत टाळाटाळ केल्याचा आरोपही मांढरे यांनी केला आहे.आमदार साहेबाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे कामे होतात काय अशी शंका उपस्थित गावकऱ्यामध्ये झाली आहे.जोपर्यंत रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होत नाही,तोपर्यत काम होऊ देणार नसल्याचे उमराव मांढरे,तेजराम राणे व बालक राऊत यांनी म्हटले आहे.