29.6 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अलिबाग येथे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर उत्साहात

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अलिबाग येथे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर उत्साहात

0
6

गोंदिया,दि.०१ः- अलिबाग ( रायगड )येथे २८जून रोजी आयटक प्रणित, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर संपन्न झाले यात गोंदिया जिल्ह्यातून 11 कार्यकर्त्यांनी भाग घेतला. यात राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ. मिलिंद गणवीर,जिल्हाध्यक्ष चत्रूगण लांजेवार, जिल्हा सचिव रविकुमार किटे,विष्णू हत्तीमारे, विनोद शहारे,महेंद्र भोयर,आशिष उरकुडे, खुशाल बनकर, देवेंद्र मेश्राम, दुर्गेश न्यायकरे,चिरंजीव सोनवाने यांचा समावेश होता.मंगेश म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या एक दिवसीय अभ्यास शिबिराचे उदघाटन डॉ . राजेंद्र गोरे यांनी केले . प्रमुख वक्ते म्हणून प्रा .कॉ. तानाजी ठोंबरे, कॉ .नामदेव चव्हाण व कॉ . एडव्होकेट राहुल जाधव हे होते तर या कार्यक्रमात कॉ . सुहासिनी मोकाशी व राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ . मिलींद गणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती . पुरोगामी – सामाजिक कार्यकर्त्या इंजि. कॉ . मोहिनी गोरे ( ठोंबरे ) यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या .
शिबिराच्या पहिल्या सत्रात प्रा .कॉ. तानाजी ठोंबरे यांनी ‘मार्क्सवाद व फुले, शाहू, आंबेडकर ‘ तसेच कामगार कायदयाचे अभ्यासक अँड . राहुल जाधव यांनी ‘ बदलते कामगार कायदे आणि संघटनेचे महत्व ‘ या विषयांवर तसेच दुसऱ्या सत्रात प्रा . तानाजी ठोंबरे यांनी ‘ जात, वर्ग व समाज ‘ आणि कॉ . नामदेव चव्हाण यांनी ‘सरकारच्या कामगार विरोधी धोरण व संघटनेचे कार्य व महत्व याचे विश्लेषण केले.शिबीराच्या अंतिम सत्रानंतर महासंघाचे पदाधिकारी आणि निमंत्रित सदस्यांची बैठक याच ठिकाणी घेण्यात आली . सदर बैठकीत संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे .आयोजित राज्यस्तरीय अभ्यास शिबीर आणि नियोजित बैठकीला कॉ. मिलिंद गणवीर, कॉ .सखाराम दुर्गुडे, ए .बी. कुलकर्णी, बबन पाटील, शाम चिंचणे, निळकंठ ढोके, उज्वल गांगुर्डे, गोविंद म्हात्रे, चत्रुघ्न लांजेवार, सचिन गाडेकर आदी पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या अनेक जिल्हयातून आलेले शिबिरार्थी -ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .