27.8 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ आयुक्त संजय काटकर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र भुयारला भेट;आशा व जन आरोग्य...

आयुक्त संजय काटकर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र भुयारला भेट;आशा व जन आरोग्य समितीशी संवाद

0
20

भंडारादि. 10 : आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) चे अभियान संचालक संजय काटकर (IAS) यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र भुयार येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविकाजन आरोग्य समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली.भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधारुग्णसेवा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्णप्रभावी आणि सर्वसामान्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला.

 आशा स्वयंसेविकांनी गावपातळीवरील कामकाजातील अडचणी मांडल्या. त्यावर आवश्यक समन्वय व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातीलअसे काटकर यांनी सांगितले.आरोग्य विभागात डिजिटल प्रणालीचा अधिकाधिक वापर करून पेपरवर्क कमी करण्यासह कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल ॲपऑनलाइन अहवाल प्रणाली आणि डिजिटल डेटा नोंदणीसाठी सातत्याने प्रशिक्षण दिले जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जन आरोग्य समित्यांनी माता-बाल आरोग्यलसीकरणकुटुंब कल्याणआजार प्रतिबंध आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी अधिक सक्रिय भूमिका बजावावीअसे आवाहन करण्यात आले.

 यावेळी डॉ. गोगुलवारडॉ. मनिष नंदनवारजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभियेजि.प. सदस्या संगीता नवघरेतालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. डी. कैकाडेवैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य कानडे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.