27.8 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण

0
11

 गोंदिया, दि.10 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील गावस्तरीय कृषी औजारे बँक घटकांतर्गत निवड झालेल्या महिला बचत गट व ग्रामसंघांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे, कृषी औजारे बँकेची स्थापना तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund AIF) योजनेस पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहबविण्याची माहिती देण्यासाठी जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि.9 जुलै 2026 रोजी नवीन प्रशासकीय इमारत, गोदिया येथील सभागृहात आयोजित करण्यात आला.

          सदर कार्यक्रम प्रकल्प संचालक (आत्मा) अजित आडसूळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, उपसंचालक (आत्मा) रुपेश मेश्राम, उपविभागीय कृषी अधिकारी देवरी महेंद्र ठोकळे उपस्थित होते.

          प्रमुख प्रशिक्षक म्हणून भूपेंद्र पुंडे (सी.ए.) यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याबाबत सखोल माहिती दिली. नोडल अधिकारी गोंदिया शेरान पठाण यांनी कृषी औजारे बँकेसाठी यंत्रांची निवड, प्रापण प्रक्रिया तसेच घटकाच्या अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्प विशेषज्ञ (कृषी व्यवसाय) गोंदिया चैतन्य जोंधळेकर यांनी कृषी व्यवसायाशी संबंधित विविध घटक, व्यवसाय नियोजन तसेच उपलब्ध व्यावसायिक संधीबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund – AIF) योजनेबाबत सचिन कुंभार यानी मार्गदर्शन केले.

         यावेळी प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटाचे आणि ग्रामसंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामुळे महिला बचत गट व ग्रामसंघांच्या प्रतिनिधींना कृषी औजारे बँकेची प्रभावी स्थापना, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणामुळे कृषी औजारे बँक घटकाची प्रभावी अंमलबजावणी होण्यास निश्चितच मोठी मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.