27.6 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home राजकीय क्षेत्राच्या विकासात दोन्ही जनप्रतिनिधीची भूमिका महत्वाची ठरणार – खा.प्रफुल पटेल

क्षेत्राच्या विकासात दोन्ही जनप्रतिनिधीची भूमिका महत्वाची ठरणार – खा.प्रफुल पटेल

0
46

खासदार राजेंद्र जैन व आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा जाहीर सत्कार थाटात

भंडारा,दि.११- आपल्या आशीर्वादाने केंद्र व राज्यात महायुतीची डब्बल इंजिनची सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून विकासाला गति मिळाली आहे. राज्यातील शेतकरी आर्थिक डबघाईस जाऊ नये यासाठी कर्जमुक्ती योजनेची अंबलबजावणी केली जात आहे शिवाय जेव्हा जेव्हा शेतकरी असो किव्हा सर्वसामान्य नागरिक किंबहुना भगिनी अडचणीत आल्या तेव्हा महायुतीची सरकार त्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभी राहत आहे. हे सर्वांग प्रगतीच्या पाहुलखुणा आहेत. महायुतीने विदर्भाला मान देऊन तुमच्यातला प्रतिनिधी राजेंद्र जैन यांना राज्यसभेत तर सर्वसामान्य म्हणून ओळख असलेला अविनाश ब्राह्मणकर यांना महायुतीने विधान परिषदेत संधी दिली आहे. या दोन्ही जनप्रतिनिधींना मिळालेली संधी म्हणजेच गोंदिया भंडारा सह पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महत्वाचे ठरणार असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

भंडारा येथे महायुती सत्कार समितीच्या वतीने राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व विधानपरिषदेचे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल तर उदघाटक म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले तर प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आमदार डॉ परिणय फुके तसेच आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार संजय पुराम,  वीरेंद्र अंजनकर,लायकराम भेंडारकर,सुनील फुंडे,धनंजय दलाल आदी मान्यवर उपस्थित होते.सत्कार सोहळा प्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच विविध संघटनांचे, सेल, आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.