29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्हे येथे जनआरोग्य समिती सभेचे औचित्य साधूनआरोग्य शिबीर व...

प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्हे येथे जनआरोग्य समिती सभेचे औचित्य साधूनआरोग्य शिबीर व वृक्षारोपण

0
5

सालेकसा  :स्थानिक आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणणे, दर्जा सुधारणे आणि जनतेचा सहभाग वाढवणे या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत दर महिन्याला जनआरोग्य समितीची (JAS) सभा आयोजित करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्हे येथे नुकतीच जनआरोग्य समितीची सभा उत्साहात पार पडली.या सभेचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गोर्हे पीएचसी परिसरात भव्य मोफत आरोग्य शिबीरवृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी शहारे यांनी दिली आहे.जनआरोग्य समितीच्या सभेदरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जनआरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या विमलताई कटरे, सहअध्यक्ष तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम, तसेच समिती सदस्य रेखाताई फुंडे, प्रियाताई शरणागत, रामेश्वरजी कटरे, विजयजी भोयर, रविनाताई मेंढे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात विविध गंभीर आजारांची मोफत तपासणी

२२ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी व गरोदर मातांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिराच्या स्वरूपाविषयी माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. बारई यांनी सांगितले की, या शिबिरात प्रामुख्याने खालील तपासण्या करण्यात आल्या:

  • गरोदर मातांची विशेष तपासणी

  • सिकलसेल चाचणी: सोल्युबिलिटी व एचपीएलसी (HPLC) इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी

  • असंघर्षात्मक आजार तपासणी: रक्तदाब (Blood Pressure), मधुमेह (Diabetes) व थायरॉईड (Thyroid)

  • इतर चाचण्या: सीबीसी (CBC) व सर्वसाधारण शारीरिक तपासणी (General Checkup)

आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान

हे शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्हे येथील संपूर्ण वैद्यकीय व आरोग्य पथकाने मोलाचे योगदान दिले.यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी शहारे, डॉ. बी. डी. बारई, आरोग्य सहाय्यक व्ही. के. मांढरे, आरोग्य सहाय्यिका ममता कावळे व शिला भैसारे, फार्मासिस्ट वैशाली चुटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कावेरी कोल्हे, समुदाय आरोग्य अधिकारी मृणाली कोकाटे, डॉ. प्रशांत शेंडे व स्नेहा वैरागडे, आरोग्य सेविका आशा पटले, प्रिती गेडाम, रुपाली बनाटे व सविता बोरकर, आरोग्य सेवक संतोष रिनाईत, चंद्रशेखर पटले, मंगेश मसराम व जी. बी. ठाकरे, आशा गटप्रवर्तक इंदुताई पटले, परिचर अनिल शहारे व सतीश असारी तसेच स्वच्छक नंदकिशोर भांडारकर यांनी रुग्णांना आरोग्य सेवा पुरवली.

blank