25.9 C
Gondiā
Monday, September 7, 2026
Home विदर्भ “माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचा” — आमदार विजय रहांगडाले

“माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचा” — आमदार विजय रहांगडाले

0
4

तिरोड्यात सेवानिवृत्त, आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार

चित्रा कापसे / तिरोडा :“तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात आजवर जलसिंचनाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे वेगाने प्रगतीपथावर आहेत. नुकतीच सुमारे ३०० कोटी रुपयांची जलसिंचन योजना मंजूर करून आणण्यात यश आले आहे. या सर्व विकासकार्यात आणि माझ्या वाटचालीत गुरुजनांचा आशीर्वाद व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे,” असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून तिरोडा येथील ड्रीम गार्डन लॉन येथे सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. परिणय फुके होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन, विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, हेमंत पटले, भाजपा जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्र रहांगडाले, तिरोडा नगराध्यक्ष अशोक असाटी, जिल्हा परिषद सभापती रजनी कुंभरे, पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण, जीडीसीसी बँकेचे संचालक डॉ. अविनाश जयस्वाल, जि.प. सदस्या तूमेश्वरी बघेले, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, सभापती देवेंद्र तिवारी, न.प. सदस्या ममता बैस व सदस्य संजयसिंह बैस आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

गुणवंतांचा व शिक्षकांचा गौरव:या सोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणरत्नांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षकांच्या अनमोल योगदानाचा गौरव करतानाच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाची टाळ्यांच्या गजरात दखल घेण्यात आली.शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत उज्वल भविष्य घडवावे, असा सूर या वेळी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विवेक ढोरे, नीरज सोनवणे, रजत धुर्वे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.