24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News जम्मूतील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण

जम्मूतील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण

0
28

नांदेड, दि. २९ – जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या तळावर मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ जवान शहीद झाले असून त्यापैकी एक महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. संभाजी कदम असे त्याचे नाव असून ते नांदेड येथील रहिवासी होते.

नागरोटातील चकमकीत शहीद झालेले संभाजी यशवंत कदम 5 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान होते. ते जानापुरी, ता. नांदेड येथील मूळ रहिवाशी आहेत. जानापुरीचे सरपंच बळी पाटील यांना लष्करी मुख्यालयाकडून माहिती कळविण्यात आली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी लष्करी मुख्यालयाच्या संपर्कात आहेत. शहीद कदम यांचे पार्थिव नांदेडकडे आणण्यासाठी समन्वय साधण्यात येत आहे.