24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ अहेरीत घर कोसळले, वृद्ध आई-वडिलांसह मुलगा जखमी

अहेरीत घर कोसळले, वृद्ध आई-वडिलांसह मुलगा जखमी

0
31

अहेरी, ता.२९: राहते घर कोसळल्याने एका युवकासह त्याचे वृद्ध आई-वडील गंभीर जखमी झाल्याची घटना येथील इंदिरानगरात काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. विठ्ठल आलाम (७०), रुक्मणी आलाम(६०) व किशोर विठ्ठल आलाम(२५) अशी जखमींची नावे आहेत.
काल रात्री किशोर व त्याचे आई-वडील घरी झोपून असताना अचानक रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांचे घर कोसळले. यामुळे तिघेही जण मलब्याखाली दबले. घर पडल्याचा आवाज येताच नागरिकांनी धाव घेऊन घरात दबलेल्या तिघांनाही बाहेर काढून अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. परंतु तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.