25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ महादेव जानकरांनी राजीनामा द्यावा-फॉरवर्ड ब्लाक

महादेव जानकरांनी राजीनामा द्यावा-फॉरवर्ड ब्लाक

0
30

भंडारा,दि.०५-महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करीत निवडणुक आयोगाला वडसा-देसाईगंज नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवाराला निवडणुक चिन्ह देण्यासबंधी केलेल्या दुरध्वनीच्या मुद्याला घेऊन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे विदर्भ उपाध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर यांनी जानकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.पालांदूरकर यांनी दिलेल्या पत्रकानुसार राज्याचे मंत्री कुणाचा कोणता अर्ज रद्द करावा व कोणता ग्राह्य धरावा याबद्दल निवडणुक आयोगाला सुचना देऊन कुठल्या उमेदवाराला कुठले निवडणुक चिन्ह देण्यासंबधी निर्देश देत असतील निवडणुक आयोग हवाच कशाला अशा प्रश्न उपस्थित केला आहे.तसेच जानकरांनी आदर्श आचार सqहता भंग केल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्याव अशी मागणी केली आहे.सोबतच ज्या निवडणुक अधिकाèयाला भ्रमणध्वनीवर सुचना दिल्या त्याने निवडणुक आयोगाकडे याबाबीची तक्रार केली नसल्यास त्या अधिकाèयावरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे.