भवभूती महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

0
17

आमगाव,दि.05-येथील भवभूती महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे वाणिज्य शिक्षणातील अडचणी व आव्हाने या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. भुस्कुटे व संयोजक वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. जी. पी. घोडे हे होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. पी. एम. चंद्रगिरीवार व डॉ. एम. एस. लिल्हारे हे होते. कार्यक्रामाच्या उद्धाटन सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. दिनेशकुमार अगरवाल, विद्यापीठ विकास मंडळ रातुम विद्यापीठ, नागपूर, डॉ. विनायक देशपांडे, माजी कुलगुरू व समन्वयक वाणिज्य शाखा रातुम नागपूर विद्यापीठ, प्रमुख वक्ते डॉ. एम. एम. चितळे माजी संचालक स्टॅाक एक्सचेज मुंबई, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार केशवराव मानकर, कार्यवाह, भवभूती शिक्षण संस्था आणि प्रमुख उपस्थीतीत सुरेशबाबु असाटी, अध्यक्ष, भवभूती शिक्षण संस्था आमगांव हे होते. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एम. भुस्कुटे यांनी महाविद्यालयाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली तसेच प्रा. जी. पी. घोडे यांनी चर्चा संबंधी उद्देष स्पश्ट केला. उद्घाटनीय भाषाणात डॉ. अगरवाल यांनी बदलत्या परीस्थीतीमध्ये वाणिज्य शिक्षणातील आव्हान संधी यावर मार्गदर्शन केले.
प्रथम सत्रात डॉ. एम. एम. चितळ,े माजी संचालक स्टॉक एक्सचेज मुंबई, यांनी आपल्या व्याख्यानाात औद्योगिक क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार वाणिज्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल होणे आवश्यक आहे. तसेच वाणिज्य क्षेत्रातील षिक्षकानी आवष्यकतेनुसार सर्व विशय अभ्यासले पाहिजे आणि विद्यार्थापर्यत पोहचविले पाहिजे, वाणिज्य विशयाचे ज्ञान प्रात्याक्षिक स्वरूपात विद्यार्थाना समजावून सांगणे गरजेचे आहे, वाणिज्य षिक्षण प्रत्येक वर्शाला नवीन अभ्यासक्रम घेउन बदलत्या स्थितीनुसार विद्यार्थापर्यत पोहचविले पाहिजे, मोठया औदयोगीक संस्थेचा वार्शिक अहवाल जसे – टाटा, रिलायन्स, एल एन्ड टी टिस्को, हिन्दूस्थान लिव्हर इ. विद्यार्थ्यांना समजवून सांगणे. औदयोगीक क्षेत्राकरिता आवष्यक विशय लक्षात घेउन सर्व विशय अभ्यासक्रमात घेतले पाहीजे असे सांगितले.
व्दित्तीय सत्रात डॉ. विनायक देषपांडे, माजी कुलगुरू व समन्वयक वाणिज्य शाखा रातुम नागपूर विद्यापीठ, यांनी सांगीतले की, औदयोगिक क्षेत्रामध्ये वाणिज्य अभ्यासक्रमातील विद्यार्थी या सोबतच व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची प्राधान्याने आवष्यकता असते.
तृत्तीय सत्रात श्रीमती राखी महीराल रेनापूरकर, हैद्राबाद विद्यापीठ, हैद्राबाद यांनी आपल्या व्याख्यानात भारतातील वाणिज्य शिक्षणात विविध आव्हाने आहेत. यामध्ये अभ्यासक्रमातील बदल, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील चर्चा करून नवीन शैक्षणिक तंत्राची स्वीकृती केली पाहिजे, असे सांगितले. चतुर्थ सत्रात चर्चा सत्रातील विषयावर विविध संषोधकांचे शोध निबंध सादर करण्यात आले. या सत्रास अध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर व जज डॉ. संजय डेकाटे, जवाहर नेहरू महाविद्यालय, वाडी, नागपूर आणि श्रीमती राखी रेनापूरकर हे होते. शोध निबंध सादरीकरणात प्रथम क्रमांक प्रा. स्वप्नील दातार व व्दितीय क्रमांक प्रविण बोद्रे, अकोला प्राप्त यांना स्मृतिचिन्ह देउन सन्मानीत करण्यात आले.
चर्चा सत्रामधील संगणकीय कार्यात प्रा. बी. वाय. कठाणे व सुशिल खापर्डे यांचे मोलाचे लाभले. कार्यकामाचे संचालन प्रा. पठ्ठे यांनी केले. प्रत्येक सत्रामध्ये आभार प्रदर्शन अनुक्रमे डॉ. धानोरकर, डॉ. आंनद देषपांडे, प्रा. ठाकूर, प्रा. तावाडे,यांनी केले. संपूर्ण कार्यक्रामाचे आभार प्रदर्शन प्रा. जी. पी. घोडे यांनी केले. चर्चा सत्रामध्ये हैद्राबाद, गोडवाना, नागपूर विद्यापीठातील 86 संषोधकांनी उपस्थीती दर्शवीली. कार्यक्रमात माजी विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रामाच्या यशस्वीते करीता महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.