25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Top News नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या

नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या

0
31

कुरखेडा, ता.१०: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.९) लवारी येथे माजी उपसरपंचाची हत्या केली. भिकरु रैनू केरामी(४०) असे मृत इसमाचे नाव आहे.
नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबर या कालावधीत नक्षलवादी दरवर्षी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. यंदा या सप्ताहात नक्षल्यांनी कुठल्याही विघातक कारवाया केल्या नाही. मात्र सप्ताह संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नक्षल्यांनी भिकरु केरामी याची हत्या केली. भिकरु केरामी याने लवारी हे त्याचे मूळ गाव सोडले होते. काही कामानिमित्त तो काल लवारी येथे आला होता. रात्री ७ वाजताच्या सुमारास गावाबाहेरील शेतात वीज जोडणीच्या कामावरील मजुरांशी गप्पा करीत असताना १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी तेथे आले. त्यांनी बिखरुला लवारी-बिजापूर रस्त्यावर नेले. तेथे धारदार शस्त्र व गोळी घालून भिकरु केरामी यास ठार केले. हत्या केल्यानंतर नक्षल्यांनी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी टाकली. त्यात भिकरु पोलिसांच्या संपर्कात होता, असे लिहिले आहे.