शिव शर्मा यांची भाजपमध्ये घरवापसी

0
10

निवडणुकीच्या तोंडावर निलंबन रद्द : नगराध्यक्षपदाकडे डोळा
गोंदिया : गोंदिया नगर पालिकेचे स्विकृत सदस्य शिव शर्मा यांना ९ एपिÑल रोजी आमदार गोपालदास अगÑवाल यांना मारहाण केली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, नगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने आज(ता. १०) त्यांचे निलंबन रद्द केले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत हेमंत पटले यांनी ही माहिती दिली. आमदार गोपालदास अगÑवाल यांनी ९ एपÑील रोजी विधानसभा मतदार संघात केलेल्या कामांची माहिती देण्याकरिता पत्रपरिषद बोलावली होती. पत्रपरिषद सुरू असताना स्विकृत नगरसेवक शिव शर्मा यांनी येवून आमदार गोपालदास अगÑवाल यांना मारहाण केली होती. दरम्यान भारतीय जनता पक्षाने शिव शर्मा यांना निलंबित केले होते. त्याचपÑकारे गैरकृत्य करणाºयांना कॉंगÑेसने देखील आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, कॉंगÑेसने नैतिकतेचे पालन केले नाही. या काळात शिव शर्मा यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्यात करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली. ऐन पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिव शर्मा यांचे निलंबन रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्षपदाचे ते उमेदवार तर नाही, अशी चर्चा सुरू झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनोद अगÑवाल, माजी नगराध्यक्ष अशोक जायस्वाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, भरत क्षत्रीय, पंकज रहांगडाले, भाऊराव उके, ऋषीकांत शाहू आदींची उपस्थिती होती.

नगराध्यक्षपदाकरिता १८ अर्ज
गोंदिया आणि तिरोडा नगर पालिकेची सार्वत्रीक निवडणूक
घोषीत झाली. येत्या ८ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. नगराध्यक्षपदाकरिता गोंदिया येथून १८ अर्ज, तर तिरोडा नगर पालिकेकरिता पाच अर्ज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला पÑाप्त झाले. येत्या १३ तारखेला नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती हेमंत पटले यांनी यावेळी दिली.