24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home क्रीडा शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

0
16

मुंबई, दि. 17 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी आपला राजीनामा व्यवस्थापकीय समितीकडे सुपूर्द केला आहे. आता व्यवस्थापकीय समिती राजीनाम्याबाबत निर्णय घेणार आहे. लोढा समितीच्या शिफाशींवरुन सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला चांगलंच खडसावलं असून न्यायालयात होणा-या अंतिम सुनावणीआधीच शरद पवारांनी राजीनामा दिला आहे. लोढा समितीने क्रिकेट संघटनेमध्ये 70 पेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती पदावर राहू नये अशी शिफारस लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात केली होती. लोढा समितीच्या याच शिफारशीमुळं शरद पवारांनी एमसीएच्या अध्यक्षपदावर न राहण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला आहे.

blank