24.6 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Top News अण्वस्त्रवाहू अग्नी-5 ची चाचणी यशस्वी, संपूर्ण पाक-चीनपर्यंत करु शकते मारा

अण्वस्त्रवाहू अग्नी-5 ची चाचणी यशस्वी, संपूर्ण पाक-चीनपर्यंत करु शकते मारा

0
22

नवी दिल्ली दि.26- देशातील सर्वात लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची ओडिशामधील व्हीलर द्विप येथे चाचणी झाली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांनी ही माहिती दिली आहे. अण्वस्त्र हल्ल्यासाठी अग्नी-5 सक्षम आहे. या क्षेपणास्त्राने पाकिस्तान, चीन, युरोप पर्यंतही थेट हल्ला करता येऊ शकतो. अवघ्या 20 मिनिटांत 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

– अग्नी क्षेपणास्त्राचा याआधी 3 चाचण्या झाल्या आहे.
– जमीनीवरुन जमीनीवर मारा करता येणाऱ्या मध्यम पल्ल्याचे इंटरकॉन्टिनेंटल रेंजचे हे क्षेपाणास्त्र आहे.
– क्षेपणास्त्रात आरएलजी (रिंग लेजर गायरोस्पेस) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ते अधिक लक्ष्यभेदी ठरणार आहे.
– अग्नीमध्ये 85% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

अग्नीचे खास वैशिष्ट्य
– अग्नी-5 मध्ये 5 हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.
– 1000 किलो पर्यंत वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता आहे.
– अमेरिका वगळून संपर्ण आशिया, अफ्रिका आणि यूरोप भारताच्या टप्प्यात आला आहे.
17 मीटर लांब अग्नी-5 चे वजन 50 टन आहे. लाँचिंग सिस्टिममध्ये कॅनस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला सहजतेने कुठेही ट्रान्सपोर्ट करता येऊ शकते.

blank