पाच राज्‍यांतील निवडणुक कार्यक्रम, या आठवडयात करणार निवडणुक आयोग घोषणा

0
3

नवी दिल्ली – निवडणूक आयोग या आठवड्यात पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करू शकतो. निवडणूक कार्यक्रम २८ डिसेंबरला जाहीर होईल, अशी शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, आधी २२ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार होता, पण गोव्याने ख्रिसमसनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असा आग्रह धरला होता. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, आयोगाने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक तैनातीसाठी केंद्रीय सुरक्षा दले पाठवण्यास सुरुवात केली आहे. या राज्यात २०१२ प्रमाणेच सात टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. मतदानाची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशमधून होऊ शकते. तेथे केंद्रीय सुरक्षा दले पाठवण्यात आली आहेत. पंजाबसाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या १०० तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये आधी निवडणूक होईल आणि नंतर बोर्डाच्या परीक्षा होतील. अशाच प्रकारे उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यातील कार्यक्रम निश्चित केला जाईल. आयोग जानेवारीअखेर ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान कार्यक्रम निश्चित करेल, असे दिसते.