23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home क्रीडा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे

0
33

पुणे, दि. 6 – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अभय आपटे, सचिवपदी रियाझ बागवान, उपाध्यक्षपदी विजयकुमार ताम्हाणे आणि चंद्रकांत मते यांची निवड झाली आहे. एमसीएने आज बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. न्या. लोढा समितीच्या शिफारशींनुसार, संघटनेत ९ वर्षे पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना यापुढे पद भूषविता येणार नसल्याचा आदेश अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या आदेशाची अंमलबजावणी करीत अजय शिर्के यांनी एमसीएचे अध्यक्षपद सोडले. सुधाकर शानभाग यांनी सचिवपदाचा तसेच धनपाल शाह आणि कमलेश ठक्कर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी अनुक्रमे बागवान, ताम्हाणे आणि मते यांची निवड झाली आहे. ताम्हाणे हे पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे सचिव असून यांच्या रूपात पीवायसीतील पदाधिकाºयांची प्रथमच एमसीएच्या मोठ्या पदावर निवड झाली आहे. एमसीएतील या ४ पदांसाठी आजच्या विशेष बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांबाबत एकमताने निर्णय झाला. शिर्के यांनी बैठकीनंतर याबाबत माहिती दिली.

blank