पुरस्कारात वृत्तपत्र विक्रेत्यांचाही सहभाग असावा- विवेक खडसे

0
10

पत्रकार दिन थाटात साजरा, वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
गोंदिया,दि.६ : समाजात व विविध घटकात होणाऱ्या अन्याय अत्याचारावर प्रकाश टाकून पत्रकार ती बाब वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आणतो. विशेष म्हणजे त्या वृत्तपत्राला शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य हा वृत्तपत्र विक्रेता करीत असतो. म्हणून पत्रकारांच्या व त्यांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. असे असले तरी ते आपले कार्य कोणतीही तमा न बाळगता करीत असल्याने या घटकालाही शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात यावा. असे मत जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी व्यक्त केले.
आज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक विश्रागृह येथे आयोति पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अलताफ शेख, पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रा.एच.एच.पारधी, सचिव संजय राऊत, वरिष्ठ सदस्य विकास बोरकर, वृत्तपत्रविक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोयर, सचिव हर्षदिप उके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वृत्तपत्रविक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना श्री.खडसे यांनी पत्रकार व वृत्तपत्रविक्रेत्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने बातमीदारांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची माहिती दिली. यावेळी मार्गदर्शक प्रा.पारधी यांनीही आपले मत व्यक्त करीत पत्रकार संघाच्या दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृत्तपत्रविक्रेते हर्षदिप उके, हेमंत हलमारे, दुर्गाप्रसाद अग्रहरी, हरजित वाढई, विरेंद्र अग्रवाल, संतोष खानोरकर, राजेंद्र राजकुमार, महेश तरोणे, रमेश भोयर, राजेश वैद्य, कृष्णा शर्मा, कस्तुरचंद सोनवाने, विरेंद्रसिंग ठाकुर, शिवप्रसाद कोठेवार यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना सावन डोये यांनी मांडली, तर आभार महेंद्र बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेमेंद्र कटरे, नविन अग्रवाल, आनंद मेश्राम, रवि सपाटे, उदय चक्रधर, मुनेश्वर कुकडे, हरीष मोटघरे, बाबा शेख, देवेंद्र बिसेन, महेंद्र माने यांनी परिश्रम घेतले.