32.2 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home विदर्भ देवरीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने हळदीकुंकू

देवरीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने हळदीकुंकू

0
29

देवरी,berartimes.com,दि.१७-देवरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या वर्षा पटेल यांनी उपस्थित राहून तालुक्यातील सर्व महिलांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थक पदाधिकाèयांना मकरसक्रांतीसोबतचत आपण सर्वांचे आयुष्य अखंडित असेच सौभाग्यमय राहो अशा शुभेच्छा दिल्या.श्रीमती पटेल यांनी केंद्रसरकारच्या नोटबंदी व कॅशलेष योजनेवर कडाडून टीका करीत सर्वसामान्यांचे जिणे कठीण केल्याचे सांगितले.या सरकारच्या काळात महिलांच्या बचत गटांना उतरती कळा आल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी नगराध्यक्ष सुमनताई बिसेन,महिला बालकल्याण सभापती दविंद्रकौर भाटिया,तालुका महिला अध्यक्षा पारबता चांदेवार,आमगावच्या अध्यक्षा कविता रहागंडाले,प.स.सदस्या अर्चना ताराम,निलोफर आफताब शेख,उषा तिवारी,अंजु अग्रवाल,मंदिरा वालदे,अंजली दरवडे,वैशाली भेंडारकर,लता बडोले,ऊर्मिला परिहार,पुष्पा मस्के,सुमन औरासे यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.