देवरी तालुक्यात डायरीयाची लागण

0
18

देवरी,दि.१७-आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यात डायरीयाची लागण झाली असून ९ लहान मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परंतु रुग्णालयात औषध साठा उपलब्ध नसल्याने खासगी दुकानातून औषधे आणून रुग्णांच्या नातेवाइकांना उपचार करून घ्यावा लागत आहे. qप्रस नरेश नंदेश्वर कोठीटोला,भावेश लेकराम मेश्राम देवरी,आकांक्षा सुरेंद्र शेंडे मुल्ला,अभिनव तिलक नेताम नवाटोला,दक्ष बिसनलाल कोराम गडेगाव,आर्यन शिवकुमार राऊत,प्राची सुरेश बांबोळे देवरी,स्नेहा नंदलाल गावळ तेढा यांचा समावेश आहे. हे सर्व दीड ते ९ वर्षाच्या आतील मुले मुली आहेत.मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दुष्यंत हुमणे यांनी मंडई व मकरसंक्रांतीच्या काळात परगावी जाऊन काही खाणे व दूषित पाणी पिल्याने हे आजारी पडत आहेत मात्र डायरीयाची लागण नसल्याचे सांगितले.