विद्युत क्षेत्रात सतर्कता व सावधगिरी बाळगणे महत्वाचे : मुख्य़ अभियंता पारधी

0
19

गोंदिया,दि. 17 – सतर्कता व सावधगिरी बाळगणे या दोन शब्दाला विद्युत क्षेत्रात बरेच महत्व़ आले आहे. या दोन गोष्टींचे पालन केल्यास विद्युत क्षेत्रात कार्य करणा-या अधिकारी व कर्मचा-यांसोबतच विद्यार्थी मित्र, शेतकरी बंधु व जनसामान्य़ लोकांमध्ये विजेचे अपघात ब-याच प्रमाणत टाळता येते, असे प्रतिपादन महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य़ अभियंता जे एम पारधी यांनी केले.ते डी बी सायंस कॉलेज येथे विद्युत निरिक्षक कार्यालय, भंडारा व महावितरण गोंदिया परिमंडळ कार्यालय यांच्या द्वारे सयुक्त़रित्या आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह च्या समारोपिय कार्यक्रमात आपल्या अध्य़क्षिय भाषणात बोलत होते.
कार्यक्रमाला गोंदिया मंडळाचे अधिक्षक अभियंता एल. एम. बोरीकर, अधिक्षक अभियंता पायाभुत आराखडा शंकर कांबळे, विद्युत निरिक्षक भंडारा अंसारी, डी बी सायंस कॉलेज चे प्राचार्य डॉ. नायडू, महावितरण गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद सस्ते मंचावर उपस्थित होते.
विषयावर आपले विचार मांडतांना श्री पारधी म्ह़णाले की आजच्या आधुनिक काळात अन्ऩ, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या तिन मुलभूत गरजांसोबतच वीज ही चौथी आवश्य़क गरजामध्ये शामिल झाली आहे. त्यामुळे वीजेचा वापर ही एक चैनीच्या वस्तुसोबतच निष्काळजीपणा करणे ब-याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतो. सेफ्टी (डअऋएढध) शब्दाची व्याख्या करतांना श्री पारधी म्ह़णाले की सेफ्टी म्ह़णजे देखरेख(र्डीर्शिीींळीळेप), जागरूकता(अुरीशपशीी), ओळखीचे (ऋराळश्रळरी), शिक्षित असणे (एर्वीलरींशव), प्रशिक्षण (ढीरळपळपस) व आपण स्व़त: (र्धेी). या सर्व बाबींचे पालन करण-या व्य़क्तीला वीजेच्या क्षेत्रात एक सुरक्षित व्य़क्ती म्ह़णता येईल.
विद्यार्थी मित्रांमध्ये वीजे सुरक्षे संबंधी जागरूकता यावी, यासाठी श्री पारधी यांनी पाच ‘वीजेसंबंधी उत्कृष्ठ़ कार्य करणारे विद्यार्थी यांचा सत्कार महावितरण गोंदिया परिमंडळ कार्यालय येथे १ मे २०१७ या दिवशी करण्याचे जाहिर केले.
विषयावर बोलतांना प्राचार्य डॉ नायडू यांनी विद्यार्थांना महावितरणचे ब्रॅन्ड़ ॲम्बेसेडर बनून जनसामान्य़ लोकांमध्ये वीजेबददल जागरूकता निर्माण करण्याचा सल्ला या प्रसंगी दिला.
आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात श्री बोरीकर म्ह़णाले की वीज हे आजच्या घडीला विकासाचे एक महत्व़पुर्ण साधन मानले जाते. त्यामुळे वीजेसंबंधी होणारी चुक ही माफ करता येउ शकत नाही. श्री बोरीकर यांनी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थांना आप आपल्या घरी एङउइ लावण्याचा सल्ला दिला.
अधिक्षक अभियंता पायाभुत आराखडा शंकर कांबळे, प्रमोद सस्ते, व दिलीप शेंडे, रामनगर विभागाचे वरिष्ठ़ तंत्रज्ञ विलास सायाम यांचेही वीज सुरक्षा सप्ताह संबंधी समयोचित मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी विद्युत निरिक्षक कार्यालय, भंडारा व महावितरण गोंदिया परिमंडळात उत्कृष्ठ़ कार्य केल्याबद्दल कत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. त्यात दिलीप शेंडे, सय्यद ब्रदर्स,राजेश नानोरे, संतोष आगलावे,अनिल पालझगडे,राजु फुंडे, संतोष लिल्हारे,प्रणय रावत, श्रीकांत उके,सुनिल कुलकर्णी व स्वामी हे होते.
संचालन विद्युत निरिक्षक कार्यालय गोंदिया येथिल कर्मचारी शैलाखा जाधव व हितेश्री शामेल यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्युत सुरक्षा सप्ताह दरम्यान घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्प़र्धा मधिल विजेत्यांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये पायल भटनागर, निकित बनसोड व अन्य़ विजेते शामिल होते.
याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता धामणकर, सहाययक अभियंता दखणे, कोकणे, मोहितकर व मोठया संख्येने महावितरण अधिकारी कर्मचारी व लाईन स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ़ व सर्वांचे मने जिंकणारे आभार प्रदर्शन प्रमोद सस्ते यांना केले.