35.3 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ बोंडगांवदेवी येथे मंगळवारला रमाई आंबेडकर जयंती

बोंडगांवदेवी येथे मंगळवारला रमाई आंबेडकर जयंती

0
38

अर्जुनी मोर दि. ६ – तालुक्यातील बोंडगांवदेवी येथे मंगळवारला (दि.७) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी रमाबाई भिमराव आंबेडकर यांची १२० वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार आहे.
मिलींद बुध्दविहार बोंडगांवदेवी येथे आयोजित रमाबाई आंबेडकर जयंती ची सुरवात सकाळी ९ वाजता बुध्द वंदनेने होईल.धम्मरॅली ११ वाजता त्यानंतर रमाई आंबेडकर यांच्या जिवनपटावर सामाजिक परिवर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा येथील सामाजिक कार्यकत्र्या तनुजाबाई नेपाले राहतील तर उदघाटक मार्गदर्शक म्हनुन सौ सुनिता हुमे,विशेष अतिथी म्हनुन सौ डहाट,प्रा डॉ प्रदिप भानसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.रात्री ८ वाजता स्वप्नील प्रस्तुत व नितीन रामटेके निर्मित ‘ एक रात्र निळ्या पाखरांची ‘ या भिमबुध्द गिताचा ऑर्केष्टा सादर होणार आहे. या जयंती महोत्सव कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अशोक रामटेके, संतोष टेंभुर्णे, जितीन रामटेके, मंगेश ठवरे, अजय वालदे यांनी केले आहे