35.3 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
11

तिरोडा,दि.२५ः-अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त अदानी समूहातर्फे देशभरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.तिरोडा येथे अदानी पॉवर लिमिटेडच्या CSR अंतर्गत कार्यरत अदानी फाऊंडेशनतर्फे CBO मयंक दोशी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरासाठी भंडारा व नागपूर येथील वैद्यकीय पथकांनी आपली मोलाची सेवा प्रदान केली. अदानी हेल्थकेअर टीमच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला कर्मचारी आणि स्थानिक समुदायातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.blank

तिरोडा येथे आयोजित शिबिरात एकूण ७८६ जणांनी रक्तदान केले. संकलित रक्ताचा उपयोग संपूर्ण रक्त (Whole Blood), पॅक्ड सेल व्हॉल्यूम (PCV), प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट, प्लाझ्मा, फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा (FFP), क्रायोप्रेसिपिटेट आणि अल्ब्युमिन यांसारख्या विविध रक्तघटकांच्या निर्मितीसाठी होणार असून.सन १९९६ पासून अदानी फाऊंडेशन भारतभर शाश्वत आणि परिणामकारक सामाजिक विकासासाठी धोरणात्मक सामाजिक गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहे. फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य व पोषण, शाश्वत उपजीविका, समुदाय विकास आणि हवामान कृती या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवत आहे.फाऊंडेशनची कार्यनीती भारत सरकारच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत आहे.