39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ तहसील कार्यालयावर धडकला महिला मोर्चा

तहसील कार्यालयावर धडकला महिला मोर्चा

0
25

सालेकसा दि.14 :: विदर्भ बहुजन क्रांतीकारी विद्यार्थी, महिला, शेतकरी संघटना व ममता व्यसनमुक्ती केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांना घेवून सोमवारला (१३) सालेकसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा धडकला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सांगडे यांना देण्यात आले.
कैलास गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता चुटे, किरण मोरे, महेंद्र पटले, रघुनाथ चुटे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे, विदर्भात दारू बंदी व्हायला पाहिजे, शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, महिलांवर होणारे अत्याचार बंद झाले पाहिजे, विदर्भातील बेरोजगारांना मुद्रालोन विना अट वाटप झालेच पाहिजे, इसनाटोला येथील विनोद शिवणकर या युवकाची हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, रोजगार हमी योजनेचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे, अंगणवाडी, आशा कार्यकर्ता व ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे अशा अनेक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महेंद्र पटले, दिपाली बारसे, कांचन गोल्हणेवार, पारबता नारसे, रिता दोनोडे, शशी फुंडे, रूपाली कावळे, वर्षा मेश्राम यांच्यासह शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.