24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home शैक्षणिक रामकिशोर कटकवार यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

रामकिशोर कटकवार यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

0
25

गोंदिया दि.१५: श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदियाद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत संस्थेचे प्रेरणास्थान स्व.रामकिशोर कटकवार यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात कथा कथन, कविता, निबंध, चित्रकला, बुद्धिबळ, भाषण, वादविवाद स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये प्रोग्रेसिव्ह शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पध्रेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार तथा स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी.रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव, अभय गुरव, वीणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, विलास नागदेवे, प्रमोद वाडी, मीनाक्षी महापात्रा, वर्षा सतदेवे, सुषमा वर्षीकर, कुलदीप भौतिक, तोमेश पारधी, सुरेखा बघेल, लीला ठाकरे, रिमा शाहू यांनी अभिनंदन केले.

blank