24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ ट्रक व टेम्पोच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

ट्रक व टेम्पोच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

0
17

यवतमाळ, दि. 28 – दारव्हा ते कारंजा रोडवर ट्रक व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघातग्रस्त ट्रक नादुरुस्त असल्याने तो रस्त्याशेजारी उभा करण्यात आला होता. यावेळी 2 मेकॅनिक रस्त्याशेजारी असलेला ट्रक दुरुस्त करत होते. यादरम्यान, मागून येणा-या टेम्पोची जोरदार धडक त्या ट्रकला बसली. अपघातात मृत पावलेले मेकॅनिक ट्रकखाली असल्याने त्यांना स्वतःच्या बचावासाठी हालचाल करणंही जमलं नाही. मृत पावलेले दोन्ही मेकॅनिक हे आर्णी येथेली रहिवासी होते. माऊल गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.