25 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home राजकीय मुंबईत गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

मुंबईत गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

0
27

मुंबई दि. 3 : अरुण गवळीची मुलगी व अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. स्थायी समितीमध्ये सदस्य आणि आरोग्य विभागाचे सभापती करण्याचे आश्वासन भाजपने दिल्याने गवळी यांनी पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना आणि भाजप महापौरपदासाठी संख्याबळाची जमवाजमव करीत असून, एकूण 14 अपक्ष नगरसेवकांपैकी जास्त नगरसेवकांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत असताना अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. गीता गवळींच्या पाठिंब्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढले असून महापौरपदावर दावा सांगण्यासाठी भाजपला आणखी बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे.
शिवसेना भवनात गुरुवारी हजेरी लावल्याने गीता गवळी या सेनेला पाठिंबा जाहीर करतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र गीता गवळी आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्या चर्चेतून काही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी दबाव तंत्र वापरल्यामुळे गवळी यांनी सेनेसोबत न जाता भाजपची साथ देण्याचे ठरविले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.