26.1 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ गोंदियात जेसीआयतर्फे सदभावना दौड

गोंदियात जेसीआयतर्फे सदभावना दौड

0
28

गोंदिया- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोंदिया येथील जेसीआयच्या वतीने सदभावना दौडचे आय़ोजन करण्यात आले आहे.

या सदभावना दौडमध्ये महिलांच्या सुरक्षा आणि सन्मानाखातर पुरूष आणि युवक सुद्धा भाग घेऊ शकतील. शहरवासीयांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जेसीआय अध्यक्ष अॅड. सुनीता जैन, संयोजक धर्मिष्ठा सेंगर, कृतिका सेठ, अश्विनी केंद्रे यांनी केले आहे.या स्पर्धेची सुरवात बुधवारी (ता.8)स्थानिक सुभाष बागेपासून सकाळी साडेसहाच्या सुमारास होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.