23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News नक्षल्यांनी दोन ट्रक व दोन ट्रॅक्टर जाळले

नक्षल्यांनी दोन ट्रक व दोन ट्रॅक्टर जाळले

0
23

गडचिरोली,दि.१२: सशस्त्र नक्षल्यांनी आज बुधवारला दुपारी चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रांतर्गत कोठरी गावानजीक बांबू वाहतूक करणारे दोन ट्रक व दोन ट्रॅक्टर जाळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोट वनपरिक्षेत्रांतर्गत कोठरी येथील कक्ष क्रमांक ३८३ च्या जंगलात वनविभागाने बांबू कापून ठेवले होते. सध्या या बांबूची वाहतूक करण्यात येत आहे. आज दुपारी २ वाजताच्या सुमारास २५ ते ३० सशस्त्र नक्षल्यांनी घोट-पोटेगाव मार्गावर कोठरी गावापासून ५ किलोमीटर अंतरावर बांबू वाहतूक करणारे दोन ट्रक व दोन ट्रॅक्टर अडविले. मजुरांना कमी मजुरी दिली, असे ठणकावत नक्षल्यांनी वाहनचालक व मजुरांना एके ठिकाणी बसवून चारही वाहनांना आग लावली. यात चार वाहने व बांबू जळाल्याने वनविभागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही ट्रक बल्लारपूर वनविभागाचे आहेत. एक ट्रॅक्टर विठ्ठलवाडा(जि.चंद्रपूर)येथील जीवन अवतारे, तर दुसरा ट्रक मधू लखमापुरे रा.मारडा(जि.चंद्रपूर) यांच्या मालकीचा असल्याचे समजते. जाळपोळ केल्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. मजुरांनी घटनेची माहिती घोट पोलिस व वनधिकाऱ्यांना दिली.