24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने शेतक-याची आत्महत्या

मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने शेतक-याची आत्महत्या

0
34

लातूर, दि. 20 – एका मुलीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच हुंड्यामुळे एका शेतक-याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अल्प भूधारक शेतकरी शिवराम बाळूराम सूर्यवंशी (45) यांनी आपल्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली.  मुलीच्या लग्नासाठी हुंडा आणि खर्चाची जमवाजमव होऊ शकत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा गावातील ही घटना आहे.