६४ कोटींच्या निधीतून ५६ गावातील ‘शिवार’ होणार जलयुक्त

0
13

भंडारा दि.20: दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात सन २०१७-१८ मध्ये भंडारा जिल्ह्यात सातही तालुके मिळून ५६ गावात १७१७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी ६३ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी खर्च होणार आहे. यात सर्वाधिक ५७८ कामे वन विभागाची, कृषीची ४८९ कामे, तर ग्रामपंचायत विभागाची ४२८ कामे प्रस्तावित आहेत. या सर्व कामांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ मध्ये भंडारा तालुक्यातील मांडवी, सितेपार, कवडसी, चांदोली, खापा, गांगलेवाडा, राजेगाव, मालीपार व डोंगरगाव. तुमसर तालुक्यातील लोहारा, सोनपूरी, चुल्हाड, चांदपूर, भोंडकी, सोरना, लंजेरा, परसवाडा, आग्री व चुल्हारडोह. मोहाडी तालुक्यातील नवेगाव बु., जांभळापाणी, दवडीपार, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव व देऊळगाव. पवनी तालुक्यातील सिरसाळा, बेटाळा, शेळी सो, खातखेडा, भावड, मेंढेगाव, कन्हाळगाव व निष्टी. लाखांदूर तालुक्यातील मुशी, मासळ, कोच्छी, घोडेझरी व मानेगाव. साकोली तालुक्यातील सिरेगाव (टोला), झाडगाव, गिरोला, किटाळी, खांबा, बाम्पेवाडा व गुढरी आणि लाखनी तालुक्यातील कन्हेरी, इसापूर, पेंढरी, डोंगरगाव- न्या, मचारणा, कोलारी, चिखलाबोडी व जेवनाळा अशा एकूण ५६ गावांचा समावेश आहे.

या गावात विविध यंत्रणांकडून १७१७ कामे प्रस्तावित आहेत. यात कृषी विभाग ४८९, ग्रामपंचायत विभाग ४२८, वन विभाग ५७८, लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद १३८, लघुसिंचन जलसंधारण ६, पाटबंधारे विभाग ८, भूजल सर्वेक्षण ५५, सामाजिक वनीकरण २ , ग्रामीण पाणीपुरवठा ३ व इतर २५ कामांचा समावेश आहे. विविध यंत्रणा मिळून भंडारा तालुक्यात २९६, मोहाडी ३५६, तुमसर २४१, पवनी १८०, साकोली २६७, लाखनी २२८ व लाखांदूर १४९ कामे करण्यात येणार आहे.