सामान्य विद्यार्थ्यांना दिले जाते मुकबधीराचे शिक्षण

0
8

वाशिम, दि. 20 – मुकबधीरांच्या व्यथा सर्वसामान्य नागरिकांनाही कळाव्यात यासाठी देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वर्गातील सामान्य विद्यार्थ्यांना मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षण दिले जात आहे. यामध्ये विद्यार्थी एवढे पारंगत झाले आहेत की, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर इशाऱ्याने पटापट देतात. या शाळेचे जिल्हयात कौतूक केले जात आहे.

वाशिम तालुक्यातील छोटेस गाव देपूळ. येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संजीवनी नामदेव चव्हाण यांना मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतची माहिती असल्याने त्यांनी शाळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचे ज्ञान असावे म्हणून मुख्याध्यापक सुरेश उगले यांच्याशी चर्चा केली. उगले यांनी सुध्दा संजिवनी चव्हाण यांच्या कल्पनेचे स्वागत केले. आजच्या घडीला मुख्याध्यापक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली संजिवनी चव्हाण विद्यार्थ्यांना मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षण देत आहेत.