25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ आमदार रहागंडालेनी घेतली वीज वितरण अधिकार्यांसोबत बैठक

आमदार रहागंडालेनी घेतली वीज वितरण अधिकार्यांसोबत बैठक

0
23

तिरोडा,दि.22-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी शुक्रवारला मतदारसंघातील परसवाडा येथील भारनियमनाच्या मुद्याला घेऊन परसवाडा स्थित महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट देत चर्चा केली.यावेळी परिसरात होत असलेले भारनियमनामुळे रब्बी पिक धोक्यात आल्याची माहिती परिसरातील शेतकर्यानी आ.रहागंडाले यांना दिली.तसेच गेल्या आठ दिवसापासून वीज पुरवठाच खंडीत असल्याची माहिती दिली.यावर आमदार रहागंडाले यांनी केंद्रातील अभियंते व इतर विज कंपनीच्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन तत्काळ विजेची समस्या सोडवून शेतकर्याना 12 तासाएैवजी 18 तास विजपुरवठा करण्यासंबधीचे निर्देश दिले.यावेळी माजी जिप सदस्य अर्जुन नागपूरे,गटविकास अधिकारी डाॅ.प्रकाश गंगापारी,वित वितरण कंपनीचे अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

blank