खडसे प्रकरणात शेवटचा युक्तिवाद २४ तारखेला

0
6

नागपूर,दि.22 : भोसरी (जि पुणे) येथील जमीन खरेदी प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान खडसे यांनी चौकशी समितीच्या कार्यकक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, अंतिम निर्णयाच्या वेळी चौकशी समिती कोणते मुद्दे कार्यकक्षेत येतात व कोणते मुद्दे येत नाही, हे ठरवेल असे स्पष्ट करण्यात आले असून २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन आपल्या नातेवाईकांना दिली. ही जमीन एमआयडीसी-उद्योग विभागाची असून खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने न्या. दिनकरराव झोटिंग समिती नेमली. नागपुरात या चौकशी समितीचे कार्यालय असून चौकशी व सुनावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.