24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ दारू दुकान हटवा नगरसेविकासंह महिला सरसावल्या

दारू दुकान हटवा नगरसेविकासंह महिला सरसावल्या

0
32

लाखांदूर,दि.5 : गावातील देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी लाखांदूरच्या नगरसेविकांसह महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नगर पंचायतच्या सभेत ठराव घेण्यात आला असून दुकान हटविण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे.

लाखांदूर शहरातील राज्य मार्गालगतचे ७ बार व २ देशी दारू दुकाने बंद झाले. परंतु देशी दारूचे दोन दुकाने गावात सुरू आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये रहदारीच्या मार्गावरील या दुकानामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील महादेव मंदिरात भाविकांची रेलचेल असते, मात्र मंदीर परीसरातच देशी दारू दुकान असल्याने भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेसह भयमुक्त वातावरणासाठी नगरसेविका संगिता गुरनुले यांनी पुढाकार घेऊन हा विषय नगरपंचायतच्या सभेत ठेवला. त्यावर नगरसेवकांनी सहमती दर्शवुन दुकान स्थलांतरीत करण्यासाठी ठराव पारीत केला. या मागणीचे निवेदन खा.नाना पटोले, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केले. दुकान हटविण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्षा निलम हुमने, नगरसेविका संगिता गुरनुले, लता प्रधान, रिता गोटफोडे, वनिता मिसार यांच्यासह महिलांनी दिला आहे.