24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ जि.प.सदस्य वारजूकरांनी दिल्या पंसला 100 खुर्च्या

जि.प.सदस्य वारजूकरांनी दिल्या पंसला 100 खुर्च्या

0
32

श्रीहरी सातपुते,चिमूर,दि.10– चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गटनेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते डाॅ.सतिश वारजूरकर यांनी चिमूर पंचायत समितीला 100 खुर्च्या देण्याचे 14 एप्रिलच्या कार्यक्रमात दिलेले आश्वासन पुर्ण करीत आज पंचायत समितीच्या सभापती  विद्या चौधरी यांना त्या खुर्च्या सोपविल्या.पंचायत समितीच्या सभागृहात कुठलाही कार्यक्रम घ्यायचे म्हटले की बसण्याची व्यवस्था खुर्च्याअभावी होत नव्हती,ती अडचण लक्षात घेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जि.प.सदस्य डाॅ.वारजूकर यांनी 100 खुर्च्या देण्याची घोषणा केली होती.ती त्यांनी पुर्ण केल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.खुर्च्या देतेवेळी उपसभापती शांताराम सेलवतकर, बिडीओ डोंगरे, जि. प. सदस्य ममता डुकरे , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम डुकरे,अमोद गौरकर, पंचायत समिती सदस्य रोशन ढोक ,पं.स.सदस्य भावना बावनकर आदी उपस्थित होते.