चंद्रपूरच्या बैठकीत दिल्लीच्या ओबीसी अधिवेशनावर चर्चा

0
7

चंद्रपूर,दि.-10-राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी कृती समिती व ओबीसीत मोडत असलेल्या सर्व जात संघटनाच्यावतीने आज 10 जून रोज शनिवारला जनता महाविद्यालयाच्या श्रीलिला सभागृहात  दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या व्दितीय महाधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बबनराव फंड हे होते.महाधिवेशनाच्या तयारीबाबतची भूमिका आणि ओबीसी महासंघाच्या भूमिकेची माहिती प्रास्तविकातून निमत्रंक सचिन राजूरकर यांनी मांडली. बैठकीला  प्राचार्य अशोक जिवतोडे, नंदू नागरकर,रावजी चवरे,संदिप गडमवार,दिनेश चोखारे,सुधाकर अडबाले,नरेंद्र जिवतोडे,गोविंदा बोडे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रा.शेषराव येलेकर,गुणेश्वर आरीकर,संज टिकले,शाम राजुरकर,बांदुरकर,लोहे,स्वप्नील पहानपाटे,बबनराव वानखेडे,विनायक साखरकर,लडके,बुरडकर,दिनेश कष्ी,चरण मत्ते आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी,झरी,मारेगाव व जामणी येथूनही ओबीसी बांधव उपस्थित झाले होते.

या बैठकीत प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहिर करुन,ओबीसी समाजासाठी केंद्रात स्वंतत्र मंत्रालय स्थापण करणे.मंडल आयोग,नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात यावे.ओबीसीना लादलेली असैवंधानिक क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावी.ओबीसीसांठी लोकसभा व विधानसभेत स्वंतंत्र्य मतदारसंघ निर्माण करण्यात यावे.राष्ट्रिय मागासवर्गीय आयोगाला सवैंधानिक दर्जा देण्यात यावा.ओबीसी शेतकर्याना वनहक्क पट्टयासाठी लावलेली तीन पिढंयाची अट रद्द करण्यात यावी आदी ठराव मांडण्यात येणार आहेत.हे अधिवेशन 7 आगस्टला सकाळी 11 वाजता कान्स्टिटयुशनल क्लब,रफी मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.सचांलन रवि वरारकर यांनी केले तर आभार कष्टी यांनी मानले.