28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिंदे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिंदे

0
29

रियाझ सय्यद, नांदेड,दि.20- बिलोली येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारणीची घोषणा आज दि 20 जून रोजी शासकिय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष रमेश पांडे व सरचिटणीस रूपेश पाडमुख यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने आंदोलनात्मक भुमिका घेत महाराष्ट्र राज्यात व्यापकपणे काम करणा-या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची यावर्षीची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बिलोली तालुकाध्यक्षपदी राजू पाटील शिंदे तर सचिव पदी मकरंद बोधनकर यांची जिल्हाध्यक्ष रमेश पांडे व जिल्हा सरचिटणीस रूपेश पाडमुख यांनी जाहीर करून नियुक्ती पत्र दिले. या कार्यकारणीत कार्याध्यक्ष बाबुराव इंगळे , उपाध्यक्ष माधव एडके ,उपाध्यक्ष माधव हळदेकर , कोषाध्यक्ष बसवंत मुंडकर , सहसचिव शेख मुर्तुजा , सहकोषाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड , संघटक प्रताप भिंगे , प्रसिध्दी प्रमुख देविदास कोंडलाडे , मार्गदर्शक गोविंद मुंडकर , सदस्य गणेश सोनटक्के , शंकर पवारे , साहेबराव सोंडारे , विजय सोनकांबळे , सतिष बळवंतकर , गणेश गिरगावकर , वैभव घाटे आदींचा कार्यकारणीत समावेश आहे. यावेळी यादव लोकडे , सुभाष देशमुख चिकाळेकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

blank