24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ आदिवासी समाजाचा वतीने महाराणी दुर्गावती बलीदान स्मृतीदिन आज

आदिवासी समाजाचा वतीने महाराणी दुर्गावती बलीदान स्मृतीदिन आज

0
33
गोंदिया दि. 23 :: गोंडवाना विरांगणा महाराणी दुर्गावती मडावी यांचा ४५४ वा आत्मबलीदान स्मृती दिन  उद्या (दि. .२४) सकाळी ११:३० वाजता गोंडीटोला (कटंगी) येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आदिवासी नेते गुलाबसिंह कोडापे हे राहणार आहेत.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  गोपालसिंह ऊईके, नगरसेवक हेमंत पंधरे, पंचायत समिती सदस्या  सौ.विनिताताई तुमडाम, आदिवासी गोवारी नेते दिनेश कोहळे, दामोदर नेवारे,  तुळशिराम कोडापे, सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल मडकाम,  सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, कृष्णाजी पुâन्ने, दिलीप ऊईके,  माजी उपसरपंच सौ.मंदाताई मेश्राम आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात परिसरातील नागरिक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणीराम धुर्वे,ग्रा पं सदस्या संगिताताई कोडापे, पुरणलाल चौधरी, लक्ष्मणसिंह ऊईके, शामलाल राऊत, लखनलाल वघारे आदिंनी केले आहे