गोरेगाव,दि.25: जुन्या टायरांना जाळुन तेल तयार करणा-या गोरेगाव ते ठाणा रस्त्यावर असलेल्या झांजिया या गावाजवळील कारखाना बंद करा असे निवेदन २३ जुनला तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांना शेतक-यांनी दिले.यावेळी नगरसेवक डॉ रुस्तम येडे, सुरेश चन्ने, सुरेश साठवणे, भय्यालाल खोबरागडे, निलकंठ कटरे, गंगाराम दिहारी, नारायण राऊत, सुरजलाल कोल्हारे, व्यकट कटरे, रविन्द्र बिसेन देविदास धपाडे, सुनिल मिश्रा उपस्थित होते.
अग्रवाल नामक शेतकरी यांनी सहा वर्षापुर्वी बोनाफाईट इंन्डस्टीयल प्रयोजनासाठी कृषक जमिनीला अकृषक परवानगी घेतली. पण या इसमाने जुन्या टायरांना जाळुन तेल काढण्याचा व्यवसाय सुरु केला. यामुळे या कारखान्यापासून दोन किलोमीटरपर्यत काळा धुर असायचा. यापासुन गावक-यांना दमा, फुफुसांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच या कारखाना जवळ सुरेश चन्ने, भय्यालाल खोबरागडे, निलकंठ कटरे, डॉ रुस्तम येडे, सुरजलाल कोल्हारे, दयाराम राऊत, अनतराम राऊत, देवीदास धपाडे, मुरलीधर मलेवार, बंडु कटरे यांची शेती आहे. या शेतातील पिकावर टायरांची काळी राख उडते व पिकावर उडून राखेचे थर बसत असल्याने पीक सुध्दा उपयेगात आणता येत नसल्याने सदर कारखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.सोबतच त्या कारखान्याच्या दुषित पाणी निलकंठ कटरे यांच्या शेतात व पांगोली नदीत टाकण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.





