गोंदिया विधानसभा व्हाटसअपगृपच्यावतीने रविवारला गोंदिया मंथन चे आयोजन

0
6

गोंदिया,दि.२४(berartimes.com)-सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेत गोंदिया शहराच्या विकासावर सदैव अग्रसर चर्चा घडवून आणणाèया गोंदिया विधानसभा या व्हाटसअप गृपच्या वतीने उद्या रविवार(दि.२५)सायकांळी ५ वाजता गोंदिया मंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून आलेली रक्कम ही सामाजिक कार्यासाठी दिली जाणार आहे.
व्हाटसअप गृपच्या माध्यमातून चर्चा करुन ती समस्या संबधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधीपर्यंत पोचवून सोडविण्यासाठी पुढाकार घेणारा गृप म्हणजे गोंदिया शहरातील गोंदिया विधानसभा व्हाटसअप गृप होय.या गोंदिया विधानसभा व्हाटसअप मध्ये शहरातील नामवंत लोकप्रतिनिधी,अधिकारी,पोलिस अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,समाजसेवी संस्थेचे पदाधिकारीसह विविध जातधर्माचे प्रतिनिधी सदस्य आहेत.या गृपने आपल्या चांगल्या कार्यप्रणालीमूळेच गोंदियातील बाई गंगाबाई रुग्णालयाची समस्या असो की रुग्णांना लागणारे रक्त त्यासाठी रक्तदानाची मोहिम असो.शहरातील अतिक्रमण असो की वाहतुकीची समस्या आदीवर सकारात्मक चर्चा करुन संबधित विभागाच्या प्रमुखांना माहिती देऊन समस्या सोडविण्यासाठी या गृपच्यावतीने काम केले गेले आहे.या सर्व कामाच्या माध्यमातूनच गोंदिया शहराच्या विकासावर एक चर्चा व्हावी अशी कल्पना या गृपच्या सदस्यांना आली अन त्यांनी गोंदिया मंथन या नावाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले.गेल्या एक महिन्यापासून या गोंदिया मंथन कार्यक्रमासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करीत आहेत.गोंदिया मंथन हा कार्यक्रम एक सामाजिक दायित्व समजून आयोजित करण्यात आला असून गोंदिया शहराच्या विकासावर राजकारणाला दूर सारून समाजकार्याच्या माध्यमातून कसा करता येईल यावर चर्चा केली जाणार आहे.गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे,त्यासाठी गोंदिया विधानसभा गृपने पुढाकार घेतला आहे.