23.6 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

0
35

मुंबई,दि.  1 : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल (पाशा पटेल) यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कृषी मंत्री  पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.दिनांक 23 एप्रिल 2015 रोजीच्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या संरचनेतील मानद स्वरुपाच्या अध्यक्ष पदावर दिनांक 1 जुलै 2017 पासून कृषी क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्यक्ती तथा कृषी मूल्य/शेतमाल भाव यासंबधी जाणकार व्यक्ती म्हणून सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.